शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जि.प.च्या शाळांतील ४८ विद्यार्थी ‘इस्रो’ भेटीला,फेब्रुवारीमध्ये दौरा : निबंध स्पर्धेतून निवड; १५ लाख रुपयांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:39 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ४८ विद्यार्थी फेबु्रवारीमध्ये ‘इस्रो’ भेटीला जाणार आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांसमवेत १२ अधिकारी, कर्मचारीही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही भेट शक्य

कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ४८ विद्यार्थी फेबु्रवारीमध्ये ‘इस्रो’ भेटीला जाणार आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेऊन आणि शिवाजी विद्यापीठामध्ये अंतिम फेरीतील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन ही निवड करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेने १५ लाख रुपयांची तरतूद केली होती.

या नावीन्यपूर्ण योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्येच तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आठ दिवस आधी विषय देऊन निबंध स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी अशांची तालुकास्तरावर निवड करून, त्यांना ऐनवेळी विषय देऊन तेथेच निबंध स्पर्धा घेण्यात आली. पाचवी ते आठवीच्या प्रत्येकी तीन अशा १२ आणि १२ तालुक्यांचे अशा १४४ विद्यार्थ्यांच्या शिवाजी विद्यापीठामध्ये मुलाखती घेण्यात आल्या व त्यातून अंतिम ४८ विद्यार्थी निवडण्यात आले. यामध्ये २१ विद्यार्थी, तर २७ विद्यार्र्थिनी आहेत. या विद्यार्थ्यांसमवेत १२ अधिकारी, कर्मचारीही जाणार असून, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही भेट शक्य होणार आहे.

तीन मार्गांवर विमानप्रवासया सर्व विद्यार्थ्यांना तीन मार्गांवर विमान प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. कोल्हापूर येथून गोव्याला बसने, गोवा ते थिरूअनंतपुरम, थिरूअनंतपुरम ते बंगलोर आणि बंगलोर ते पुणे असा तीन मार्गांवरचा प्रवास विमानाने होणार आहे. पुन्हा पुणे-कोल्हापूर प्रवास बसने होईल.